Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionUpdate : नितीश म्हणाले ” आता बस्स..पुन्हा नाही…” तर मोदींनी लिहिले मतदारांना पत्र… नितीशकुमार आणि मोदींचा आखरी डाव !!

Spread the love

कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारात कोण कसा प्रचार करील आणि मतदारांच्या भावनेला हात घालेल त्यावर नेत्यांचे सगळे राजकारण अवलंबून आहे. बिहार निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी “आपली शेवटची निवडणूक आहे…”   अशी भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला तर अनेक प्रचार सभा गाजवून, प्रचंड जाहिराबाजी करूनही मनाचे समाधान न झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर थेट बिहारवासियांना पत्रच लिहून टाकले.


आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी  पूर्णियामध्ये जाहीर प्रचारसभा घेतली.  यावेळी मतदारांना भावनिक साद  घालताना नितीशकुमार म्हणाले कि , आज ‘निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे हे लक्षात घ्या. यासाठी परवा मतदान होणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला’. नितीशकुमार यांनी १९७७ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. त्यांनी नालंदामधील हरनॉट येथून निवडणूक लढवली. नितीशकुमार येथून चार वेळा निवडणूक लढले. यामध्ये ते १९७७ आणि १९८० मध्ये पराभूत झाले होते. तर १९८५ आणि १९९५ च्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.

नितीशकुमार यांनी यापूर्वी शेवटची निवडणूक २००४ मध्ये लढविली होती. त्यामध्ये त्यांनी नालंदामधून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. नितीशकुमार यांनी १९७२ मध्ये बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलं. त्यांनी बिहार राज्य विद्युत मंडळामध्ये काही काळ नोकरीही केली. पण जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर नितीशकुमार राजकारणाकडे वळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदारांना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं आहे. कुशासन नव्हे तर सुशासनावर मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं आहे. आमचा मंत्र ‘सबका साथ, सबका विकास आणि सर्वांचा विश्वास’ असा आहे. मला नितीशकुमार यांच्या सरकारची गरज आहे. आणि बिहारमध्ये विकासासाठी मतदान होत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी या पत्रातून विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. अराजकता आणि अव्यवस्थेच्या वातावरणात नव निर्माण अशक्य आहे. २००५ पासून बिहारमधील स्थिती बदलली आणि नव्या नव निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. सामाजिक आणि आर्थिक उत्कर्षासाठी चांगल्या पायाभूत सुविधा आणि कायद्याचे राज्य आवश्यक आहे. फक्त हे दोन एनडीएच देऊ शकते, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!