Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : मुलीचे प्रेम पसंत नसल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न , आई , वडील आणि भावाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Spread the love

मुंबईच्या वसईतील एका १८ वर्षीय तरुणीचे एका मुलासोबत असलेले प्रेमसंबंध पसंत नसल्याने भाऊ आणि आई -वडिलांनी तिला रिक्षात बसवून सोबत फिरायला नेले आणि तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला . परंतु मुलीची आरडा ओरड ऐकून लोक धावत आल्यामुळे सदर मुलगी बेशुद्ध झाली तरी वेळीच रुग्णालयात पोहोचल्याने बचावली असल्याचे वृत्त आहे . तिच्यावर ठाणे येतील रुग्णालयात उपचार चालू आहेत. तरुणीच्या जबाबावरून वसई पोलिसांनी तिन्ही आरोपी विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

या विषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , वसई पूर्वेकडील वालीव गावातील नवजीवन नाका येथे राहणाऱ्या मुस्कान विनोद कश्यप (१८) हिचे आझाद नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुस्कान ही आझादसोबत फिरण्यासाठी गेली होती. तिला तिच्या भावाच्या मित्राने पाहिलं होतं. नंतर मुस्कानचा भाऊ सनी यानं याबाबत आई रेणू आणि वडील विनोद कश्यप यांना सांगितलं. आई, वडील आणि भावानं आपल्या मुलीला समजूत काढली. मात्र, मुस्कान ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती.

दरम्यान आई, वडील आणि भावानं रागाच्या भरात मुस्कान हिला रविवारी दुपारी रिक्षात बसवून सुरुची बागेत घेऊन गेले. समुद्र किनाऱ्यावरील झाडाझुडुपांच्या ठिकाणी पोहोचल्यावर कोणी नसल्याचे पाहून तिघांनी तिला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली . तर भाऊ सनी याने तिच्या गळ्यातील काळ्या ओढणीच्या साहाय्याने गळफास देऊन तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडा ओरडा झाल्याने स्थानिकांनी पाहिल्यावर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन जखमी तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती केलं. वसई पोलिसांनी तरुणीच्या जबाबनंतर गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. जखमी मुस्कानला बोलण्यासाठी, पाणी पिण्यासाठी त्रास होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिन्ही आरोपींना वसई कोर्टात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!