Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraUnlockNews : उद्यापासून सिनेमागृहे , नाट्यगृहे , जलतरण तलाव आणि मल्टीपेक्स सुरु करण्यास परवानगी

Spread the love

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय  कोरोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स बरोबरच जलतरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.

राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार चित्रपटगृहे , मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे  एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होत आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

दरम्यान हे सर्व सुरु करण्यात येणार असले तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणं बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणाऱ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांनाच  उघडण्यास संमती देण्यात आली आहे. अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!