Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चेवरून मायावती यांचा मोठा खुलासा

Spread the love

बसपा नेत्या मायावती यांनी राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या कृत्यावरून संतप्त झाल्यामुळे “आपण समाजवादी पक्षाला हरण्यासाठी प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे समर्थन करण्यास कचरणार नाही” , असे म्हटले होते. त्यामुळे  भविष्यात मायावती भाजपला पाठिंबा देऊ शकतात अशी चर्चा  उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात रंगली जात आहे. या सर्व चर्चेला उत्तर देताना  मायावती यांनी ही शक्यता फेटाळून लावताना ” एकवेळ आम्ही सन्यास घेऊ पण कधीही भाजपसोबत जाणार नाही, असा मोठा खुलासा  केला आहे.


आपल्या पक्षाची विचारधारा ही भाजपच्या अगदी उलट आहे. भविष्यात विधानसभा किंवा लोकसभेच्या निवणुकीत बसप भाजपसोबत कधीही आघाडी करणार नाही असे स्पष्ट करताना , उत्तर प्रदेशात विधानसभेच्या ७ जागांवर मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या एक दिवस आधी मायावती यांनी भाजपला मिळालेल्या असल्याच्या आरोपाचे खंडन करून विरोधकांना उत्तर दिले.  पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आमच्या पक्षाच्या विरोधात षडयंत्र रचण्यात गुंतले आहेत आणि अपप्रचारही करत आहेत. मुस्लिम मतदार आमच्यापासून दूर जावेत  हा या मागील उद्देश आहे. बसप जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. आमची विचारधारा ही सर्वजन धर्माची आहे. भाजपची विचारधारा याच्या उलट आहे, असे मायावती म्हणाल्या.

बसप जातीयवादी, धर्मवादी, भांडवलदारधार्जीणी विचारधारा असलेल्या पक्षासोबत कधीही आघाडी करणार नाही. एकवेळ आम्ही राजकीय सन्यास घेऊ, पण अशा पक्षाच्या सोबत कधीही जाणार नाही, असे मायावती म्हणाल्या. अशा पक्षाविरोधात आपण सदैव लढणार असून त्यांच्यासमोर कधीही झुकणार नसल्याचेही त्या म्हणाल्या.

मायावती पुढे म्हणाल्या की, ‘बसप एक विचारधारा असलेला आणि आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष आहे. जेव्हा मी भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यावेळी देखील मी कधी तडजोड केली नाही. माझ्या शासनकाळात कधीही हिंदू-मुस्लिम दंगा झालेला नाही. इतिहास याचा साक्षीदार आहे. बसपने विपरित परिस्थितीत जेव्हा केव्हा भाजपसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा आपल्या स्वार्थासाठी विचारधारेच्या विरुद्ध कोणतेही काम केलेले नाही.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!