Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ , ५३६९ नवे रुग्ण तर ३७२६ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात  ५ हजार ३६९ नवे करोनाबाधित आढळले. तर, ३ हजार ७२६ रुग्ण  कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ११३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ लाख ८३ हजार ७७५ वर पोहचली असून राज्याचा रिकव्हरी रेट ८९.९२ टक्क्यांवर पोहचला आहे.


गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या ही कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या  संख्येपेक्षा अधिक आढळली आहे. शासकीय माहितीनुसार राज्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असला तरी सुद्धा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत रोज भर पडतच आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता  मास्कच्या वापरासह करोना संसर्ग रोखण्यासाठी अन्य नियमांचे पालन करणे आवश्यक झाले आहे. राज्यातील एकूण १६ लाख ८३ हजार ७७५ करोनाबाधितांच्या संख्येत १ लाख २५ हजार १०९ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १५ लाख १४ हजार ७९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४४ हजार २४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

सध्या राज्यातील मृत्यू दर २.६१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख २४ हजार ८७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ८३ हजार ७७५ (१८.६६ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.सध्या राज्यात २५ लाख ४४ हजार ७९९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १२ हजार २३० जणं संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या तुलनेने  ऑक्टोबरमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाली होती मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. आज राज्यात तब्बल ५ हजार ३६९ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे तर ११३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येतील  चढ उतार चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्लीत गेल्या २४ तासात ५६६४ नवीन रुग्ण आढळून आले असून ४१५९ रुग्णांची मुक्तता झाली आहे तर मृत्यूंची संख्या ५१ इतकी आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!