Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ५५४८ नवे रुग्ण , ७३०३ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासांत राज्यात  ५ हजार ५४८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर दिवसभरात ७ हजार ३०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा १५ लाख १० हजार ३५३ इतका झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट आता ९० टक्क्याच्या अगदी काठावर पोहचला आहे. आजचा रिकव्हरी रेट ८९.९९ टक्के इतका होता.

दिवसेंदिवस राज्यात करोनामृत्यूंच्या आकड्यात  विक्रमी घट होत आहे . त्यामुळे राज्याचा करोना मृत्यूदर लक्षात घेता हा खूप मोठा दिलासा असल्याचे दिसत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा २.६२ इतका मृत्यूदर असून इतर राज्यांच्या तुलनेत हा दर जास्तच आहे. दरम्यान राज्यात आज ७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या काही महिन्यातील हा मृतांचा सर्वात निचांकी आकडा ठरला. आतापर्यंत राज्यात करोना संसर्ग झाल्याने ४३ हजार ९११ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. आजच्या आकडेवारीचा विचार केल्यास सर्वाधिक ३२ मृत्यूंची नोंद मुंबई महापालिकेच्या हद्दीत झाली आहे तर बाकी सर्वच शहरात मृतांचा आकडा कमी झाला आहे. करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या आरोग्य यंत्रणांसाठी ही खूप दिलासादायक बाब आहे.

राज्यात आतापर्यंत करोनाच्या ८९ लाख ६७ हजार चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १६ लाख ७८ हजार ४०६ (१८.७२ टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या २५ लाख ३७ हजार ५९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १२ हजार ३४२ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वेगाने खाली येत आहे. सध्या राज्यात १ लाख २३ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २४ हजार ७०२ रुग्णांवर पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी होऊन आता १७ हजार ९३७ इतका झाल आहे तर मुंबईत सध्या १८ हजार ९८० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. बाकी सर्वच शहरांतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा १० हजारच्या आत आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!