Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात आज 6190 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ , 8241 रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

राज्यात करोना विरुद्धची लढाई अगदी नेटाने लढली जात असून या लढाईला खूप मोठं यश मिळताना दिसत आहे. राज्यातील करोनामुक्त रुग्णांचा आकडा आज १५ लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला असून राज्यातील रिकव्हरी रेट आता ८९.८५ टक्के इतका झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही कमी होत असून आजच्या नोंदीनुसार सध्या १ लाख २५ हजार ४१८ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.

राज्यात आज ६ हजार १९० नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्याचवेळी ८ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ३ हजार ५० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ८९.८५ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत ८९ लाख ६ हजार ८२६ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १६ लाख ७२ हजार ८५८ (१८.७८ टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख २९ हजार ४६२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १२ हजार ४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सवालाखापर्यंत खाली आला आहे. राज्यात सध्या १ लाख २५ हजार ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २४ हजार ५७३ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहे तर मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १९ हजार २७ तर ठाणे जिल्ह्यात १८ हजार ५७८ इतका आहे. ठाणे व पुणे जिल्ह्यातील आलेख वेगाने खाली येताना दिसत आहे. राज्यात आज आणखी १२७ करोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा आता ४३ हजार ८३७ इतका झाला आहे. आज सर्वाधिक ३२ मृत्यूंची नोंद मुंबईत झाली. त्यानंतर पुणे पालिका हद्दीत सहा तर पुणे जिल्ह्यात ७ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.६२ टक्के इतका आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!