Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच , दोन दिवसात १६ लाखांचा मुद्देमाल लंपास

Spread the love

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसर,सिडको एन१व पडेगाव परिसरात चोरट्यांनी बंद घरे फोडून १६लाख रु.मुद्देमाल लंपास केला आहे. तर संग्रामनगर उड्डाण पुलाजवळ असणार्‍या तिरुमला अपार्टमेंटमधील उघड्या घरातून ४ तोळे सोन्याची चैन व एक लॅपटाॅप चोरट्याने उचलून प्रकरणी वाळूज औद्योगिक, सिडको औद्योगिक, जवाहरनगर आणि छावणी पोलिस ठाण्यात गुन्हेदाखल झाले आहेत.

बजाजनगरातील रहिवासी छोटूलाल हेमाडे हे वडलांच्या वर्षश्राध्दासाठी गावी गेले असतांना घर बंद करुन मुले नातेवाईकांकडे गेली.व ही वेळ साधंत चोरट्यांनी हमाडेंच्या घरातून साडेआठ तोळे सोनं व ४लाख २०हजार रु. रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणाची माहिती हेमाडेयांच्या किरायेदाराने फोन करुन हेमाडेंना कळवली.त्यानंतर गावाकडून परंत आल्यावर वाळूज औद्योगिक परिसरात या प्रकरणी आज संध्याकाळी ७.३०वा. गुन्हा दाखल झाला.

सिडको एन १ परिसरात जसपाल अरोरा(६३) हे कुटुंबासह गावी गेले असतांना २७ते २८आॅक्टोबर दरम्यान त्यांचे घरफोडून ३लाख ५००रु.चे सोन्या चांदीचे दागिने कपाटातून चोरुन नेले.तर पडेगाव परिसरातील सूर्यकांत जाधव या सैन्यदलातील कार्यालयात काम करणार्‍या अधिकार्‍याचे १२तोळे सोने बंद घरातून लंपास केले. ही घटना आज(२९/१०)रोजी दुपारी १२ते २या वेळेत घडली. त्यावेळी जाधव यांची पत्नी घर बंद करुन समारंभासाठी बाहेर गेल्या होत्या. तर सकाळी ७.४५च्या सुमारास संजय अग्रवाल यांच्या उघड्या घरातून ४तोळे सोन्याची चैन व एक लॅपटाॅप लंपास केला या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील प्रकरणांचा तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, संतोष पाटील आणि मनोज पगारे ,एपीआय विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करंत आहेत.

फरार आरोपीच्या गुन्हेशाखेने आवळल्या मुस्क्या

औरंगाबाद – अपनाबाजार परिसरातील प्रतिक इलेक्र्टाॅनिक्स हे एलईडी टीव्हीचे दुकान फोडून १०लाखांचा मुद्देमाल जप्त करणार्‍या टोळक्यातील शेख जावेद शेख गणी (२४)रा.भारतनगर याला गुन्हेशाखेने आज दुपारी (२९/१०) ३वा. मुकुंदवाडी परिसरातून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला जवाहरनगर पोलिसांकडे सूतूर्द केले. शेख जावेद हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार असून शहरातील विविध पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक अनिल गियकवाड यांंच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल यांनी वरील कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!