Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोदींचे राजकीय गुरु , गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांचं निधन

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री   केशुभाई पटल यांचं गुरुवारी हृदयविकारानं निधन झाले असल्याचे वृत्त आहे. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते.  केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भुषवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते.

केशुभाई यांचा जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्येही समावेश होतो. दोन वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र राजकारणामुळे तख्तपालट होऊन दोन्ही वेळेला आपला कार्यकाळ त्यांना पूर्ण करता आला नाही. २००१ साली त्यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केशुभाई यांना नरेंद्र मोदी आपला राजकीय गुरू मानत होते. १९७७ साली केशुभाई पटल राजकोटमधून लोकसभेचे खासदार बनले होते. त्यानंतर मात्र त्यांनी राजीनामा दिला आणि बाबूभाई पटेल यांच्या जनता मोर्चा सरकारमध्ये १९७८ ते १९८० पर्यंत कृषीमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!