Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणाची सुनावणी आता ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे

Spread the love

राज्यातील मराठा आरक्षणाची  सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या  मोठ्या खंडपीठाकडे होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी ५ न्यायमूर्तींचं खंडपीठ गठित करण्यात यावे अशा मागणीचा अर्ज करण्यात आला होता. तो मान्य करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ वकील संदीप देशमुख यांनी दिली, विनोद पाटील यांच्या वतीने त्यांनी बुधवारी सुप्रीम कोटात अर्ज केला होता. कोर्टाच्या रजिस्ट्रीने तो मान्य केल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे एक टप्पा पूर्ण झाल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. यानंतर सरन्यायाधीश आता मोठं खंडपीठ स्थापन करणार असून त्यातल्या न्यायाधिशांची नावे ठरविण्याचा अधिकारही त्यांना आहे. हे खंडपीठ तयार झालं की त्याच्यापुढे आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अर्ज आज सकाळी सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्री ने मान्य करून सदरील प्रकरण पाच न्यायमूर्ती कडे पाठवलेला आहे. कॅटेगरी बदलली आहे. मराठा आरक्षणाबाबत एक टप्पा आज पार झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!