Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : दुधाची दरवाढ आणि वाढीव वीज बिलांबाबत राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट , अशी झाली चर्चा ….

Spread the love

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळावी आणि वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांची भेट घेतली आहे. दरम्यान राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे यांनी आज सकाळी १०.३० च्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन  भेट घेतली.‌ ‘लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही.  म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो’, असं राज यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले कि , वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. लवकरच वाढीव वीज बिलाबाबत शरद पवारांशी चर्चा करणार आहे.  लवकरात लवकर लोकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे,  राज्यपालांकडूनही शरद पवारांशी बोलणाच्या सल्ला देण्यात आला आहे. एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे’, असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसंच,’दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी लक्ष्य वेधलं. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला १७ ते १८ रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे २७ ते २८ रुपये मिळावे’, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!