Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आरोग्यसेतू अ‍ॅपचे गौडबंगाल आहे तरी काय ? शासनाकडे काहीच माहिती उपलब्ध नसल्याने उडाली खळबळ

Spread the love

देशातील १६ कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलेल्या आरोग्यसेतू अ‍ॅप निर्माण कोणी केले याचे उत्तर सरकारला देता येत नसल्याने केंद्रीय माहिती आयोगाने सरकारलाच करणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे वृत्त आहे . विशेष म्हणजे ११  मे २०२० रोजी  हे  अ‍ॅप   aarogyasetu.gov.in या आरोग्यसेतू पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे तरी सरकारकडे याची अधिकुत माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आहे. सौरव दास या सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेत हा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर आता केंद्रीय माहिती आयोगानं यावर एनआयसी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याबद्दलचा जाब विचारला आहे.


देशात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांपासून सर्व महत्वाच्या नेत्यांकडून केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अ‍ॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या अ‍ॅपचं कौतुक केलं आहे. मात्र, या अ‍ॅपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी हे अ‍ॅप कुणी तायर केलं याविषयी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिलं आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे अजब उत्तर देण्यात आलं असून, केंद्रीय माहिती आयोगाने  यावरून माहिती मिळविण्याचे कार्य सुरु केले आहे. याबाबत लाईव्ह लॉ’ने हे वृत्त दिलं आहे.

कुठेही माहिती का उपलब्ध नाही ?

याबाबत केंद्रीय माहिती आयोगाने मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी, राष्ट्रीय माहिती केंद्र  व NeGD यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु अ‍ॅप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अ‍ॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगाने उपस्थित केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाइट gov.in या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली,” असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं असल्याचं वृत्त आहे.

कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अ‍ॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत याबद्दल माहिती दिलेली नाही. लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. “या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु अ‍ॅप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अ‍ॅप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे,” असे एन. सरण यांनी सांगितले. “जर तुम्ही हे अ‍ॅप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे,” अशा शब्दात सरण यांनी कानउघडणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!