Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्याची स्थिती दिलासादायक , उपचाराचा दर ९० टक्क्यांच्या नजीक तर मृत्यू आणि रुग्णवाढीच्या दरातही मोठी घट

Spread the love

गेल्या २४  लक्षात घेता कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक स्थिती असून राज्यातच्या कोरोनाबाधितांच्या उपचारदारात सुधारणा तर झालीच आहे परंतु कोरोनामृत्यू आणि नवीन रुग्णसंख्येतही  विक्रमी घट झाली आहे. काल दिवसभरात केवळ  ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर ३ हजार ६४५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दिवसभरात ९ हजार ९०५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून राज्याचा करोना रिकव्हरी रेट वाढून ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. दुसरीकडे राज्यातील अॅक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३४ हजारापर्यंत खाली आला आहे.


दरम्यान राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहचले असून आज गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज ९ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ७० हजार ६६० करोना बाधितांनी या आजाराला मात देण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८९.२ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ३ हजार ६४५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८६ लाख ४५ हजार १९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ४८ हजार ६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३० हजार ९०० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १३ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने खाली येत असून आजघडीला एकूण १ लाख ३४ हजार १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई -पुणे -ठाणे  जिल्ह्यातही समाधानकारक अवस्था

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण स्थिती पाहता , मे महिन्यांपासून सातत्याने १६ टक्क्यांपेक्षा अधिक असलेला करोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी दर हा ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात १० टक्क्यांच्या आत आला आहे. तर पुणे शहरात सप्टेंबर महिन्यात करोना बाधितांची संख्या वाढण्याच्या टप्प्यावर ३२ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी दर एका महिन्याने ऑक्टोबरमध्ये १२ ते १४ टक्क्यांवर येऊन सुमारे २० टक्क्यांनी घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. मुख्य म्हणजे पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २४ हजार ३५२ इतका खाली आला आहे. मुंबई पालिका हद्दीत १७ हजार ८६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात २० हजार ८२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!