Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : तामिळनाडूमध्ये मनुस्मृतीच्या विरोधात VCK चे जनांदोलन , केंद्र सरकारकडून बंदी आणण्याची मागणी

Spread the love

भारतीय  समाजामध्ये भेदाभेद निर्माण करून स्त्रियांना आणि दलितांना विषमतेची वागणूक देण्याची शिकवण देणाऱ्या मनुस्मृतीवर राज्य आणि केंद्र सरकारने बंदी घालावी, या मागणीसाठी तामिळनाडूच्या विदुथलाई सिरुथायगल कटची ( VCK) केडरने आंदोलन सुरु केले आहे. हिंदू समाजाची आचारसंहिता मानला जाणारा आणि कायद्याचा प्राचीन ग्रंथ मनाला जाणारा हा ” मनुस्मृती” ग्रंथ महिला, आदिवासी, दलित, वंचित आणि मूलनिवासींच्या विरोधात तथाकथित हिंदू उच्चवर्णीय समाजाला प्रोत्साहित करतो आणि समाजा -समाजात भेद निर्माण करतो , असे व्हीसीकेचे नेते थोल थिरुमावालावनयांनी म्हटले आहे. त्यामुळेच थोर नेते पेरियार, एम. सी. राजा आणि आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली. आता या थोर नेत्यांनंतर शंभर वर्षांनी व्हीसीके या ग्रंथावर बंदी घालण्याची मागणी करीत आहे.


भारतातील अनेक थोर नेत्यांनी पुढे नेलेले कार्यच व्हीसीके पुढे नेत असल्याचे सांगून थिरुमावालावन म्हणाले कि , मनुस्मृती माणसा- माणसात भेद निर्माण करते, तसेच स्त्रियांना खालचा दर्जा देते. अशा ग्रंथावर बंदी घातली पाहिजे. २७ सप्टेंबर या दिवशी आपण यूरोपातील पेरियारवाद्यांनी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ४५ मिनिटांचे भाषणही दिले परंतु काही लोकांनी हे ४५ मिनिटांचे भाषण कापून ते ५ मिनिटांचे करून मी महिलांचा अपमान करत असल्याचे भासवण्यात आले. हिंदुत्ववादी गट हा मेसेज माझ्याविरोधात व्हायरल करत असल्याचेही ते म्हणाले. जातीयवादी गट माझ्या संपादित केलेल्या भाषणाच्या आधारे वाद निर्माण करू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तामिळनाडूमधील हा वाद पेरियार अॅण्ड इंडियन पॉलिटिक्स या सप्टेंबरमध्ये आयोजित वेबिनारमधील एका क्लिपनंतर हा वाद निर्माण झाला. देशात सुमारे ५० टक्के असलेल्या महिलांना सनातन धर्मात कोणती वागणूक दिली जाते? दलितांचा शेकडो वर्षांपासून किती फायदा घेतला गेला? सनातन धर्म महिलांबाबत काय म्हणतो? सनातन धर्मानुसार, मनुस्मृतीनुसार, महिला या देवाने उपभोगासाठीच निर्माण केल्या आहेत असे म्हटले आहे, असे थिरूमावलावन यांनी या व्हिडिओक्लिपमध्ये म्हटले आहे.

दरम्यान “व्हीसीके”च्या या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. थिरुमावलावन यांनी महिलांचा अपमान करणाऱ्या मनुस्मृतीबाबत भाष् केले आहे. हा पेरियार आणि आंबेडकर यांनी केलेल्या जागृतीचा परिणाम आहे, असे डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन म्हणाले. “व्हीसीके”च्या या आंदोलनाला गुजरातमधील आमदार जिग्नेश  मेवाणी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. महिला, शुद्र आणि दलितांचा अपमान करणाऱ्या मनुस्मृतीविरोधात थिरूमावालावन यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जगदीश मेवाणी यांनी म्हटले आहे. महिलांची मुक्ती आणि जातींचे उच्चाटन हे एकमेकांशी संबंधित आहेत. पोलिसांनी थिरूमावालावन यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा मेवाणी यांनी निषेध केला आहे. सर्व आंबेडकरवादी त्यांच्या सोबत असल्याचेही मेवाणी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!