HathrasGangRapeCase : सर्वोच्च न्यायालयात आज हाथरस प्रकरणात महत्वपूर्ण सुनावणी

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशच्या  हाथरसमधील  सामूहिक बलात्कार आणि प्रकरणातील तीन  महत्वाच्या मुद्यांवर सर्वोच्च न्यायालय आज मंगळवारी निर्णय देणार आहे. या मध्ये या प्रकरणात होणारी चौकशी ही सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करणार की अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या ? तसेच या खटल्याची सुनावणी दिल्लीत घेतली जावी की नाही आणि पीडित आणि साक्षीदारांची सुरक्षा केंद्रीय दलांकडे द्यावी की नाही, या तीन महत्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांचे खंडपीठ या प्रकरणी निर्णय देणार आहे.

Advertisements

सदर  खटल्याची सुनावणी दिल्लीत व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात केली. हाथरस प्रकरणी एक जनहित याचिकाही दाखल केली गेली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. यूपीत खटल्याची चौकशी आणि सुनावणी योग्य होणार नाही, म्हणून हा खटला दिल्लीला हस्तांतरित करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान पीडित कुटुंब आणि साक्षीदारांचे तीन-स्तरीय संरक्षण दिलं जात असल्याचं उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं. हाथरसमध्ये १४ सप्टेंबरला १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा छळही केला गेला, असा आरोप आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि प्रशासनाकडून परस्पर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंसकार करण्यात आल्याने या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.