Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : अखेर नांदेडच्या 300 वर्षाच्या पारंपरिक दसरा मिरवणुकीला औरंगाबाद खडपीठाची सशर्त परवानगी

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज शुक्रवारी गुरुवार गुरुद्वारा बोर्डाच्या नांदेड येथील गुरूद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीला सशर्त परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या आप’त्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी नाकारल्यानंतर गुरुद्वारा बोर्डाने दाखल केलेल्या तातडीच्या याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने,  अटी व शर्ती घालून दिल्या आहेत . तसेच त्याच्या पालनाची जबाबदारी याचिकाकर्ते व गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्र सिंग बुंगई यांच्यावर टाकली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने त्यांना आवश्यक ते सहकार्य करून  मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण करावे असेही न्यायालयाने बजावले आहे. न्या. गंगापूरवाला आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या संयुक्त पीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला.


नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा च्या दसरा मिरवणुकीला तीनशे वर्षांची परंपरा आहे परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या वर्षी दसरा मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानंतर गुरुद्वारा बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली होती.  दरम्यान या याचिकेवर न्यायालयाने Covid 19  वरील सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन सचिवाकडे नवीन विनंती अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्यावर शासनाकडे  २० ऑक्टोबर झालेल्या सुनावणीत नांदेडचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी परवानगी देणे शक्य नसल्याचे सांगितले  त्यानुसार  शासनाने गुरुद्वारा बोर्डाची विनंती फेटाळून लावली होती.

दरम्यान शासनाच्या या देशाविरुद्ध गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सचिव रवींद्र सिंग बुंगई यांनी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली होती .  या मिरवणुकीसाठी कमी वेळ असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सरकारी वकील आणि मुख्य सरकारी वकिलांनी शासनाची बाजू  मांडली.  त्यावर देशभरात अनेक धार्मिक उत्सवांना परवानगी देण्यात आली आहे.  केंद्र सरकार परवानगीच्या बाजूने आहे तर राज्य सरकार का विरोध करत आहे ? असा युक्तिवाद गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राजेंद्र देशमुख यांनी केला. तसेच  राज्यात काही धार्मिक उत्सवांना राज्य शासनाने परवानगी दिल्याचेहीन्यायालयाच्या  निदर्शनास आणतानाच वाटेल तितक्या अटी व शर्ती टाका  टाका परंतु तीनशे वर्षांची परंपरा मोडू नका अशी मागणी राजेंद्र देशमुख यांनी न्यायालयाला केली होती. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या दसरा मिरवणुकीला सशर्त परवानगी देण्यास मान्यता दिली . ऍडव्होकेट देवांग देशमुख यांनी राजेंद्र देशमुख यांना सहकार्य केले. या निकालामुळे नांदेड मधील शीख समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!