Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : खा . संजय राऊत यांनी काय म्हणून काढली , जनाची , मनाची , तनाची आणि धनाची लाज ? आणि कुणाची ?

Spread the love

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला खा . संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे कि , बिहारमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत असल्यामुळे टीका केली जात आहे. पण जनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात घेत आहोत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाइन घेण्यात येणार आहे

संजय राऊत यांनी म्हटले आहे कि , ‘दसरा मेळावा घेऊ नये असं विरोधक म्हणत आहे. पण हा नियम मग मोहन भागवत यांनाही लागू होत नाही का? सरसंघचालक हे आमचे आदरणीय आहे. पण त्यांनी देखील नागपूरच्या रेशीमबागेतील सभागृहात दसरा मेळावा घेतला आहे. त्याच प्रकारे आम्हीही शिवाजी पार्कवरील वीर सावकर सभागृहात दसरा मेळावा घेत आहोत. त्यामुळे जनाची आणि मनाची ही कुणी कोणाची काढायची आणि ठेवायची? असा सवाल करत संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.

विरोधकांवर टीका करताना संजय राऊत पुढे म्हणाले कि , ‘विधानसभेवर फक्त भगवा फडकावचा नाही. पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा, असा तो दसरा मेळावा मागील वर्षी घेण्यात आला होता. आता मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असंही राऊत म्हणाले. बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहे. या सभांना हजारोंची गर्दी आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते, अगदी पंतप्रधानांसह अनेक नेते सभा घेत आहे. तिथं जनाची, मनाची, तनाची, धनाची कसली लाज बाळगायची? निवडणुका जिंकण्यासाठी, मतांसाठी लाखोंचे मेळावे चालतात पण एक ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते? जनाची मनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात आम्ही घेत आहोत’, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!