Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : निर्मला सीतारामन यांच्या आरोपावर राहुल गांधी यांनी दिले ” हे” उत्तर

Spread the love

उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणावर बोलणारे राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न निर्मला सीतारामन आणि इतर भात नेत्यांनी विचारल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांघी यांनी आपल्या ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. पंजाबमधील होशियारपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी राहुल गांधी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. त्यावर केलेल्या ट्विट मध्ये राहुल गांधी यांनी , मुलीवर बलात्कार झाला हे पंजाब सरकारने मान्य केलं आहे. उत्तर प्रदेशात तसं झालं नाही, पीडित मुलीच्या परिवाराला धमकवण्यात आलं आणि त्यांना न्यायापासून वंचित ठेवण्यात आलं. जर पंजाबमध्ये असा प्रकार झाला तर मी न्याय मिळवून देण्यासाठी तिकडेही जाईन. ”  अशा आशयाचं ट्विट करत  भाजपाला फटकारलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि प्रकाश जावडेकर यांनी होशियारपूर बलात्कार प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. “मला काँग्रेस पक्षाला विचारायचं आहे की जिथे तुमचं सरकार नाही तिथे बलात्कार झाला तर तुम्ही बहीण-भाऊ कारने त्या ठिकाणी जाऊन पिकनिकसारखं प्रदर्शन करता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये बलात्कारची घटना घडली, एका मुलीची हत्याही झाली. तरीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शांत का आहेत? प्रत्येक घटनेवर ट्विट करणारे राहुल गांधी होशियारपूरबाबत शांत का बसले आहेत? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे म्हणून ते गप्प बसलेत का?” निर्मला सीतारामन यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोषींना शिक्षा दिली जाईल असं आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिलं आहे. हाथरस बलात्कार प्रकरणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवलं होतं. राहुल आणि प्रियंका यांना झालेली धक्काबुक्की प्रसारमाध्यमांवर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर टीका करण्यात आली. ज्यानंतर राहुल आणि प्रियंका यांना पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!