Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : इतिहासात पहिल्यांदाच कवायती आणि प्रमुख अतिथीशिवाय पार पडला , संघाचा विजयादशमी उत्सव

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज, रविवारी नागपुरात पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायतीशिवाय पार पडला.  त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंड पडला आहे. प्रारंभी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हडगेवार सभागृहात शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. फक्त मोजक्या ५० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं.

यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी देशातील सर्व महत्वाच्या मुद्यावर भाष्य केले कोरोनाबद्दल बोलताना ते म्हणाले कि , कोरोना हा विषाणू जीवघेणा आहे. त्याचे वेगळे वेगळे रूप पाहण्यास मिळाले आहे. पण तो इतकाही प्रतिकारक नाही. त्याचा प्रभाव इतका जाणवत नसला तरीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोरोनावर कोणताही लस आली नाही. त्यामुळे कोरोनासोबतच आपल्याला जगावे लागणार आहे. पण खबरदारी घ्यावी लागणार आहे, असं आवाहनही भागवत यांनी केले.

आजच्या आयोजनाबद्दल  बोलताना मोहन भागवत म्हणाले की, पहिल्यांदाच कमी लोकांच्या उपस्थित विजयादशमीचा कार्यक्रम घेण्यात आला. यंदा संपूर्ण जगावर करोनाचं संकट आलं आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. करोनामुळे रोजगार सोडून गावी गेलेला मजूर परत येत आहे. परतलेल्यांना पुन्हा रोजगार आहेच असं नाही. गरज पडल्यास त्यांना आता नवीन रोजगार शोधावा लागेल. २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं शिवाय ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. संपूर्ण देशानं हे निर्णय संयमानं स्वीकारले. याशिवाय सीएएचा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही, असे भागवत म्हणाले.

‘कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे सरकारने काटेकोर नियम लागू केले आणि लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. आता लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी सरकारकडूनच नियम हे शिथिल करण्यात आले आहे. माध्यमांनीही या परिस्थितीत कोरोनाबद्दल मोठ्या प्रमाणात ऊहापोह केला. त्यामुळे लोकं घाबरली पण जास्त सतर्क झाली. कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. आणि जी लोकं लढा देता देता शहीद झाले, त्यांचे दु:ख हे मोठे आहे, असं म्हणत भागवत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!