Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : CoronaEffect : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

Spread the love

कोरोनातून मुक्त होण्यापेक्षा कोरोनमुक्त जीवन जगण्याच्या दृष्टीने जग प्रयत्नशील आहे . कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करणे , सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे आणि हात धुणे हेच परिणामकारक उपाय आहे मात्र असे असले तरी अनेक नागरिक या बाबतीत हलगर्जीपणा करताना आढळून येतात यावर कडक उपाय म्हणून इथियोपिया देशाने मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. हा नियम मोडणाऱ्यांस दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे या सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

या बाबतच्या वृत्तात म्हटले आहे कि , कोरोनाच्या संसर्गाचे सर्वात मोठे आव्हान आफ्रिका खंडातील देशांसमोर असल्याचे म्हटले जाते. बहुतांशी आफ्रिकन देश गरीब असल्यामुळे आरोग्य व्यवस्थाही बळकट नाही. त्यामुळे अनेक देशांनी खबरदारी घेत कठोर उपाय आखण्यास सुरुवात केली. इथियोपिया देश लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. एप्रिल महिन्यातच इथियोपियामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली. मात्र, कठोर निर्बंध अद्यापही लागू आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे इथियोपिया प्रशासनाने केलेल्या नियमांनुसार एकाच टेबलवर तीनपेक्षा अधिक व्यक्तिंना बसण्यास मनाई आहे. करोनाच्या संसर्गाबाबत अनेक जणांना गांभीर्य नसल्याचे सरकारने म्हटले आहे. लोक सतर्क नसल्यामुळे करोनाचा संसर्ग फैलावण्याचा अधिक धोका असल्याचे आरोग्यमंत्री लिआ टेडेज यांनी म्हटले. इथियोपियामध्ये आतापर्यंत ९१ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १४०० जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, करोनाची चाचणी कमी असल्यामुळे बाधितांबाबतचा खरा आकडा कळणे कठीण असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इथियोपियाने या वर्षी ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. इथियोपियाची लोकसंख्या ११ कोटी ५८ लाख असून नायजेरियाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. नायजेरियाची लोकसंख्या २० कोटी ७६ लाख आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!