Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन

Spread the love

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे . दरम्यान मुख्यमंत्री या मेळाव्यात काय बोलणार याकडे विरिधि पक्ष आणि शिवसैनिकांचे  लक्ष लागले  आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या संकंटानं अनेक प्रथा, परंपरा मोडीत निघाल्या राजकारणातही शिवसेनेचे शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. पण कोरोनाचं संकंट असल्यामुळे यंदा सावरकर सभागृहात अवघ्या ५० लोकांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे. ठाकरे कुटुंबियांतली पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा हा काहीसा खास आहे.

असा असेल उद्याचा कार्यक्रम

शिवसेनेने जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघून थेट  शिवतीर्थावर येतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतील. सावकर सभागृहात मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपुजन होईल. काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 7 वाजता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधतील.  दरम्यान या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे.

२०१९ च्या निवडणुकांनतर महाराष्ट्रातली बरीच गणित बदलली. महाविकास आघाडीच्या रुपानं महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात भाजप हा एकमेव पक्ष असेल ज्यांचा खरपूस समाचार घेतला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौतचं प्रकरण या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते. या प्रकरणावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता पण उद्धव ठाकरेंनी अतिशय संयमी भूमिका निभावली पण आपण मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यामुळे या प्रकरणावर काय बोलणार हे उत्सुकतेचं असणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!