Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दिलासादायक : आयकर भरला नसेल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे

Spread the love

देश कोरोना महामारीच्या संक्रमणातून जात असल्याने केंद्र सरकार देशातील नागरिकांना थोडा फार दिलासा देणारे निर्णय घेत आहे . केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आयकर भरण्याच्या  कालावधीबाबतही निर्णय घेतला असून या निर्णयानुसार आता ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून  देण्यात आली आहे. या आधी केंद्रानं  ३० नोव्हेंपर्यंत कालावधी निश्चित केला होता. त्याला त्याला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं  आज जाहीर केलेल्या या आदेशामुळे   वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून मिळाला आहे.  आयकर भरण्यासाठी यापूर्वी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती. केंद्र सरकारनं १३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) त्यावेळी असं म्हटलं होतं की, करोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत आहे.

दरम्यान प्राप्तीकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (त्यांच्या भागादारांसह) आयकर विवरणपत्र देण्याची तारीख ३१ ऑक्टोबरऐवजी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे आयकर भरण्यासाठी कालावधीत केंद्र सरकारकडून तब्बल चार वेळा वाढवण्यात आला आहे. यापूर्वी ३१ मार्चवरून ३० जून करण्यात आला होता. त्यानंतर ३१ जुलै आणि नंतर ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!