Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक बेपत्ता , सुसाईड नोट सापडल्याने खळबळ , लिफाफ्यात दिले कारण ….

Spread the love

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ताअसल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसात दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकााळी साडे चार वाजल्यापासून बेपत्ता आहेत . या प्रकरणी  शिवाजीनगर पोलीस  त्यांचा शोध घेत आहेत. पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर हे बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरू झाली. या प्रकरणी सध्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. सदर लिफाफा  उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पाषाणकर तणावाखाली होते. ही सुसाई नोट सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.पाषाणकर यांचे कुणाशी वैर होते का? ते कुठे गेले असतील? बेपत्ता होण्यामागचं कारण काय असाव या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रूपचे गौतम पाषाणकर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!