Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज , दिवाळीपर्यंत मदत देण्याचा केला वायदा

Spread the love

आपला दोन दिवसीय दौरा , शरद पवार यांनी केलेल्या सूचना आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांशी चर्चा करून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाना  १०  हजार कोटींच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे . केंद्र सरकारचे निकष आहे त्यापेक्षा जास्त मदत देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. हेक्टरला १० हजार रुपयांची मदत करण्यात येईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे ३८  हजार कोटी येणं बाकी आहे. ते पैसे मिळावे म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिवाळी आधी ही मदत पोहोचेल अशी व्यवस्था करू असंही ते म्हाणाले. हे पैसे कसे उभे करायचे त्याचा विचार सुरू असून कर्ज घ्यावं लागलं तर तेही घेऊ असंही ते म्हणाले. जिरायत, बागायत जमिनीसाठी ६८०० प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी १८,०००  रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल. एकूण केंद्राकडून येणं ३८ हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत. अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे

मुख्यमंत्री म्हणाले कि , पै. केंद्र सरकारचं पथक राज्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र अजुनही ते पथक आलेलं नाही असं सांगत त्यांनी केंद्रालाही टोला लगावला. केंद्राने दुजाभाव करू नये असंही त्यांनी सांगितलं. मला राजकारण करायचं नाही नाही मात्र जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारकडे बोट तर दाखवलं मात्र थेट आरोप करण्याचं टाळलं.  तर शेतकऱ्यांना सरकारने दिलेली मदत ही अतिशय तोकडी आहे आणि सरकारने घोषणा केलेली मदत ही फसवी आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!