Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionUpdate : मोदीजी जातील तिथे खोटं बोलतात , राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर प्रहार

Spread the love

बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेऊन परस्परांवर टीका करीत हल्ला बोल केला.  राहुल गांधी यांनी चीन सीमावाद व रोजगाराच्या मुद्यावरून मोदींना सवाल करत बिहारच्या जनतेला सत्तांतराचं आवाहन केलं. राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त बदलाव संकल्प रॅली नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला.

आपल्या प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले,”बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतोय. प्रश्न नतमस्तक होण्याचा नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले, हा प्रश्न आहे. लडाखमध्ये देशाची सीमा आहे. त्या सीमेवर बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील तरुण देशाचं संरक्षण करतात. उपाशी राहतात, पण परत येत नाहीत,” असं राहुल गांधी म्हणाले. “प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी आपल्याला जवानांना शहीद करून १२०० किमी जमीन चीननं घेतली. चिनी सैन्य भारतात आहे. चीन भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले होते की, भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण, खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की, चीनला परत कधी हद्दपार करणार. आणि येथे येऊन काहीही खोटं बोलू नका. बिहारींना खोटं बोलू नका. तुम्ही सांगा किती बिहारींना रोजगार दिली.

मोदीजी जातील तिथे खोटं बोलतात…

रोजगाराच्या बाबतीत बोलताना राहुल गांधी म्हणाले कि , मागील निवडणुकीत म्हणाले होते २ कोटी तरुणांना रोजगार देणार. कुणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात, शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व अदानीचं काम करतात. तुमच्यासमोर डोकं ठेवणार आणि काम दुसऱ्याचं करतात. भाषण तुम्हाला देणार, पण काम करायची वेळ आली की, दुसऱ्याचं करणार. नोटबंदी केली. आपल्याला फायदा झाला का? तुमचा पैसा घेतला आणि भांडवलदारांचं कर्ज माफ केलं. आता तीन कृषी कायदे केले आहेत. संपूर्ण देशात बाजार समिती व्यवस्था संपवणार आहेत. लाखो लोकांना बेरोजगार करणार आहेत आणि जिथेही जातात, तिथे खोटं बोलतात. भारताची जमीन कुणीही घेतली नाही. लाखो लोकांना रोजगार दिला. शेतकऱ्यांसोबत उभा आहे. पण, काम फक्त दोन लोकांचं करतात,” अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!