Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : ५ लाखांचा ऐवज लंपास, चोरटा घरातील असल्याचा पोलिसांचा अंदाज

Spread the love

औरंगाबाद – जटवाडा परिसरातील राधास्वामी काॅलनीत १३ कुटुंब सदस्य असतांना तीन मजली घरातून ८ तोळे सोने, १६७ गॅ. चांदी ८५ हजार रु. रोख असा साडेचार ते पाच लाख रुपयांचा ऐवज कपाटातून काल रात्री (बुधवारी ) लंपास झाला. या प्रकरणी आज दुपारी २ वा. हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जटवाडा परिसरातील राधास्वामी काॅलनीत सुनिल चव्हाण(३७) धंदा खा. नोकरी हे त्यांच्या दोन भावा सहित तीन मजली घरात राहातात. घरात एकूण १३ कुटुंब ससदस्य आहेत. तरीही तळ मजल्यावर असलेल्या कपाटातून ५ लाख रु.चा ऐवज कपाट उघडून चोरीला गेला. कपाटातील इतर वस्तू जागेवरुन हलल्या नाहीत तसेच घरात बाहेरुन कोणी प्रवेश केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे, गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी घटनास्थळी भेट दिली. श्र्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. पण ते जागेवरच घुटमळून परत गेले. सुनिल चव्हाण यांचे मोठे भाऊ हॅथवे मधे काम करतात तर लहान भाऊ बदनापूर पंचायत समितीमधे नौकरी करतात तिन्ही भावामधे दागिन्यांवरुन वाद असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना सांगितले. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलिस करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!