Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : जनावरांच्या खाद्या सोबंत गुटखा वाहतूक, दोघांना अटक , ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद – जनावरांच्या ढेपे सोबंत साडेआठ लाखांचा गुटखा वाहून नेणारा टेंपो सापळा रचून उस्मानपुरा पोलिसांनी मिलींदनगरच्या अण्णाभाऊ साठे चौकात अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत बुधवारी रात्री पकडला. या प्रकरणी टेंपो मालक व चालकाला अटक करण्यात आली आहे.
शिवहर उर्फ गोपाल मालशिखरे (४०) रा.पुंडलिकनगर, आणि त्याचा चालक शाम पांडुरंग वाघमारे अशी अटक आरोपींची नावे आहेत या पूर्वी सातारा पोलिसांनी शिवहर ला गुटखा तस्करी संदर्भात अटक केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अजिंठेकर यांना या कारवाईत पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांनी उपस्थित राहण्याबद्दल पत्र दिले होते. त्यानुसार वरील कारवाई पार पाडली पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके, पोलिस कर्मचारी अश्रफ सय्यद, सतीश जाधव, संतोष शिरसाठ, प्रकाश सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

रोझाबागेत सट्टेबाजांवर चाप १७ जण ताब्यात

औरंगाबाद – रोझाबाग परिसरात निवृत्त अधिकार्‍याच्या घरात १७सट्टेबाजांवर सिटीचौक पोलिसांची कारवाई सुरु आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यास तांबडं फुटणार अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. ५२ मोबाईल, एक लॅपटाॅप काही रोख रक्कम असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. महावितरण मधून निवृत्त झालेल्या कादरी यांच्या घरात सट्टेबाजी चालू होती.दुपारी ४ वा. खबर्‍याने ही माहिती पोलिसांना दिली.त्यानुसार सिटी चौक पोलिसांनी संध्याकाळी साडेसहा वा. धाड टाकली. या कारवाईत पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार, पीएसआय पाथरकर, एएसआय खटावकर यांनी सहभाग घेतला होता

आपलं सरकार

Click to listen highlighted text!