Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : दिलासादायक : राज्यात डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ८८ तर मृत्यूदर २.६४ टक्के

Spread the love

https://twitter.com/ANI/status/1319281058102169607

गेल्या २४ तासात राज्यात  ७ हजार ५३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर  १६ हजार १७७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण १४ लाख ३१ हजार ८५६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ८८.१ टक्के इतका झाला आहे.  मागील २४ तासात १९८ मृत्यूंची नोंद झाली असून  सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख २ हजार ५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख २५ हजार १९७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५९ हजार ४३६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २४ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५० हजार ११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ७ हजार ५३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १६ लाख २५ हजार १९७ इतकी झाली आहे. गेल्या ८ महिन्यापासून कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी गेल्या काही दिवसांपासून अलीकडच्या काळात येत असलेली आकडेवारी नक्कीच दिलासादायक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!