Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी , देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Spread the love

भाजपचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर असून वसमत येथील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या. त्यानंतर त्यांनी  सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी तसेच  शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, सरकारने बँकांना आदेश द्यावेत अशी मागणी केली. फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि , मला असं वाटतं की सरकारमध्ये फक्त बोलणारे आहेत. सगळे मंत्री रोज माईक घेऊन बोलत आहेत, मीडियात येऊन बोलत आहेत. पण शेवटी पाहणार कोण आहे? निर्णय कोण घेणार आहे? सरकार निर्णय घेण्यासाठीच आहे. कोणताही निर्णय होताना दिसत नसून फक्त टोलवाटोलवी सुरु आहे. सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्यांचा आक्रोश समजून तात्काळ निर्णय घ्या.  दरम्यान आम्हाला जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले कि , त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही. जयंत पाटलांनी आम्हाला खोटं ठरवण्याऐवजी मदत करावी. लोक इतके अडचणीत आहेत, पण पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे बोलवघेवडेपणा सोडा आणि कृती करा,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!