Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaEducationUpdate : NEET परीक्षेत नापास झालेला मृदुल अनुसूचित जमाती संवर्गात आला देशात पहिला

Spread the love

राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेत  (नीट) नापास झालेला मृदुल रावत हा विद्यार्थी पुनर्तपासणीत  एसटी कॅटेगरीत देशात पहिला आला आहे. प्रारंभी नीट परीक्षेत तो नापास झाल्याचं दाखवण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्याने निकालावर आक्षेप घेत, ओएमआर शीट आणि उत्तरपत्रिका (Answer Key)च्या आधारावर निकालाला आव्हान दिलं. त्यानुसार पुन्हा तपासणी करण्यात आल्यावर तो एसटी कॅटेगरीत देशात अव्वल असल्याचं समोर आलं. मृदुल मुलाचा राजस्थानच्या गंगापूरमधील असून तो गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीत शिक्षण घेत होता. आपण या परीक्षेत चांगल्या गुणांनी पस होणार याची त्याला खात्री होती पण निकालात तो अनुत्तीर्ण झाला होता.

आपल्या नवीन निकालानंतर मृदुलने म्हटले की, एनटीएच्या निकालातील माझ्या गुणांनुसार मी नीट २०२० परीक्षेत नापास झालो होतो. या गुणांसह कोणतंही वैद्यकीय महाविद्यालय मिळणार नव्हतं. यामुळे मला अक्षरशा रडू येत होतं व मी नैराश्यात गेलो होतो. कारण मला खात्री होती की मी नीट परीक्षा ६५० गुणांसह उत्तीर्ण होणारच. परंतू हा निकाल पाहिल्यानंतर मला मोठा धक्काच बसला. यानंतर मी एटीएच्या निकालाला आव्हान दिलं व पुन्हा तपासणी झाल्यावर माझा खरा निकाल समोर आला. एनटीएने चूक मान्य केल्याने मी आनंदी आहे. मी ६५० गुणांसह एसटी कॅटेगरीत देशात अव्वल आहे. तर, सर्वसाधरण श्रेणीत माझा देशात ३५७७ वा क्रमांक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!