Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : उद्यापासून सर्व महिलांसाठी लोकलची सुविधा आणि सर्वांसाठी लोकल विषयावर होणार बैठक

Spread the love

मुंबईतील सरसकट सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. या छोट्याशा ट्विटमध्ये त्यांनी राज्य सरकारला चिंता घेण्याची संधीही सोडली नाही . रेल्वेची नेहमीच तयारी होती पण राज्य शासनाने परवानगीचे पत्र दिले असा हा चिमटा आहे.

राज्य सरकारने मात्र असे म्हटले आहे कि , महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचं म्हटलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असं वाटत असतानाच तो जैसे थेच राहिला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र आज पाठवलं.  त्याची मात्र दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली दिसत असून महिलांना राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही लोकल सेवा सुरू होत नसल्याने नोकरदारांचे मोठे हाल होत आहेत. तसेच  बसमधून प्रवास करावा लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वांसाठी पुन्हा लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. सर्व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करावी, यासाठी राज्य सरकारने ही बैठक बोलावली आहे. राज्य सरकारचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांच्यात उद्या होणाऱ्या बैठकीत सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याबाबतची चर्चा होईल. महिला प्रवाशांबाबत जो गोंधळ निर्माण झाला तो टाळण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!