MaharashtraNewsUpdate : घटना बदलाच्या वक्तव्यावर खेद व्यक्त करून खा . संभाजीराजे यांनी केली ” हि ” दुरुस्ती, पवारांची यावरची प्रतिक्रियाही वाचा ….

Advertisements
Advertisements
Spread the love

आत्ताच मी पुरग्रस्त भागाची पाहणी करून मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. आणि मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलेल्या बातम्या…

Posted by Yuvraj Sambhajiraje Chhatrapati on Sunday, 18 October 2020

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे. मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना ‘दुरुस्ती’ ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असावा’ असा खुलासा करीत आपल्या वक्तव्याबद्दल खा . संभाजीराजे छत्रपती यांनी  खेद व्यक्त केला आहे. संभाजीराजे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपल्या विधानाबद्दल अखेर हा खुलासा केला आहे.

Advertisements

दरम्यान, तुळजापूरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  पत्रकार परिषदेत जेंव्हा पत्रकारांनी या दोन्हीही राजांच्या  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर  त्यांना प्रश्न विचारून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावर मिश्कीलपणे बोलताना ,  पवार म्हणाले की, ‘आम्ही राजेंना सांगणारे कोण? त्यांना कोण प्रश्न विचारणार, ते प्रजेचं काम नाही’ असं मार्मिक उत्तर पवारांनी  दिलं .

आपल्या फेसबुकवरील खुलाशात खा . संभाजी राजे यांनी म्हटले आहे कि , ‘पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मराठा आरक्षणा बाबत संसदेत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो असे विद्वान सांगत आहेत, आणि मी त्याचा अभ्यास करून पावले उचलणार आहे’ असं म्हणत संभाजीराजेंनी खेद व्यक्त केला आहे. भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी पंढरपूरच्या महापुराची पाहणी केली होती. त्यवेळी पत्रकारांशी बोलत असताना मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंनी राज्य घटनेत बदल करण्याबाबत वक्तव्य केले होते.

Advertisements
Advertisements

खा . संभाजी राजे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वत्र तीव्र भावना व्यक्त केल्या जात होत्या . ‘आपण ECBC कायदा तयार केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला मागास असल्याची मान्यता सुद्धा दिली आहे. हायकोर्टानेही या कायद्याला मान्यता दिली. त्यामुळे राज्य सरकारची ही जबाबदारी आहे. जर राज्य सरकारकडून काही घडले नाही. तर  केंद्र सरकारकडून जर राज्य घटना बदलून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असेल तर त्यासाठी माझा अभ्यास सुरू आहे’ असं संभाजीराजे म्हणाले होते.

आपलं सरकार