Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांची टीका, शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी

Spread the love

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करून शरद पवार यांच्याकडे सरकारच्या नाकर्तेपणाचा बचाव करणे एवढेच काम असल्याची टीका केली आहे. फडणवीस यांनी आपल्या दौऱ्याला बारामतीपासून सुरुवात केली आहे .  बारामती तालुक्यातील उंडवडी येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतीच्या प्रश्नांसोबतच राजकीय प्रश्नांनाही उत्तरं दिली. कोरोनाच्या काळात घरात बसून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं पवारांनी समर्थन केलं आहे. मुख्यमंत्री मुंबईत थांबून राज्यभराचा आढावा घेत असतात. आम्हीही त्यांना माहिती देत असतो, असं पवार म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी पवारांना टोला हाणला. राज्य सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याचं व सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम पवार साहेबांकडे आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

‘राज्याला राज्याची जबाबदारी घ्यावीच लागेल, ती झटकून चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ ही मदत घोषित करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकर्‍यांना त्या कामासाठी एक हिस्सा का होईना राज्य शासनाने तातडीने मदत केली पाहिजे. पंचनाम्यांच्या भानगडीत अडकू नये,  शेतकऱ्यांना काय मदत द्यायची हे महत्त्वाचं आहे,’ शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री होते. केंद्राची मदत कशी मिळते हे त्यांना माहीत आहे. केंद्राचे पथक येते, राज्याचा अहवाल केंद्राकडे जातो, गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसून त्यानुसार मदतीची भूमिका निश्चित करतात. असं असताना केंद्राकडे बोट का? शेतकऱ्यांना ही टोलवाटोलवी नको आहे, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले कि ,  ‘अतिवृष्टी, पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱयांना भरीव मदत करण्याची गरज आहे. केंद्राकडून मदत मिळविण्याचा आम्ही सर्व तो प्रयत्न करू. परंतु राज्यानेही भरीव मदत करणे गरजेचे आहे.  नुकसानीसाठी मोबाईलमध्ये काढलेला फोटो ग्राह्य धरत प्रत्येकाला मदत मिळेल, यासाठी आम्ही आग्रही राहू. प्रत्येक गोष्ट केंद्रावर टाकायची आणि आपण मात्र नामानिराळे राहायच, आपल जणू काही कामच नाही, ही जी प्रवृत्ती आहे ती योग्य नाही, अशी जोरदार टीकाही फडणवीस यांनी केली. राज्यपालांच्या पत्रावरून चालू असलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले कि ,  ‘राज्यपालांचं एखादं वाक्य आणि त्यावरून झालेल्या वादावर बोलण्याची ही वेळ नाही. तुमचे जे काही मतभेद आहेत, ते चालत राहतील. यापूर्वीही मतभेद झालेले आहेत. आम्हीही पाहिलंय. राज्यपाल व सरकार एकाच पक्षाचे असतानाही मतभेद झालेले आहेत. मात्र, आता तो विषय नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!