MaharashtraCrimeUpdate : न्यायालयातून अपहरण झालेल्या पुण्यातील वकिलाची झाली हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

पुण्याच्या  शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून १ ऑकटोबर रोजी अपहरण केलेल्या वकिलाचा खून झाला असल्याचा खुलासा  पोलिसांनी केला आहे. उमेश चंद्रशेखर मोरे असं खून झालेल्या वकिलाचं नाव आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून १ ऑक्टोबर रोजी वकील उमेश मोरे यांचं अपहरण करण्यात आलं होतं . या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले उमेश मोरे संध्याकाळी घर न परतल्याने कुटुंबाने धावाधाव सुरू केली. तसंच मोरे यांच्या कुटुंबातील सदस्याने पुणे पोलिसात तक्रारही  दाखल केली होती.

Advertisements

दरम्यान दोन आठवडे उलटून गेल्यानंतर उमेश मोरे यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना अपयश आलं होतं. त्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांनी मागच्या आठवड्यात मंगळवारी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासमवेत बैठक घेतली. “आम्ही पोलिसांना उमेशचा शोध अधिक वेगवान करण्यासाठी विनंती केली आहे. पोलीस आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आपण या प्रकरणात लक्ष घालू,” अशी माहिती पीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी दिली होती.  त्यानंतर आता अखेर उमेश मोरे यांच्याबद्दल हा महत्त्वाचा खुलासा झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे यांचा समावेश आहे. जमिनीच्या वादातून मोरे यांचा खून झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार