Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कोम्बिंग आॅपरेशन राबवत दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या, दोन “वॉन्टेड” गुन्हेगारांनाही केली अटक

Spread the love

औरंगाबाद : कोम्बिंग आॅपरेशन राबवत पुंडलिकनगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले. तसेच दोन गुन्ह््यातील पसार आरोपींना देखील अटक केली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांकडून पोलिसांनी जांबिया, तलवार, चाकु, दोरी आणि मिरची पुड जप्त केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून नाकाबंदी आणि गस्त वाढविण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन देखील राबविले जात आहे.

शनिवारी रात्री अकरापासून गारखेडा परिसरात पुंडलिकनगर पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवले. रात्री साडेबाराच्या सुमारास गजानननगरात पाच जण संशयितरित्या दोन दुचाकींसह उभे असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले. तर त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातून निसटला. त्यावेळी चौघांच्या अंगझडतीतून पोलिसांनी तलवार, जांबिया, चाकु, दोरी आणि मिरची पुड हस्तगत केली. पोलिसांनी यावेळी हितेंद्र नवनाथ वाघमारे (२४, रा. रमाईनगर, हर्सुल), अजय राजकुमार ढगे (२२, रा. सैलानीनगर, हिंगोली नाका, नांदेड), किरण सुदाम शिंदे (२४, रा. गल्ली क्र. ५, गजानननगर, गारखेडा परिसर), आकाश अर्जुन चाटे (२०, रा. गल्ली क्र. ४, न्यू हनुमाननगर, गारखेडा परिसर) यांना अटक केली. तर त्यांचा साथीदार राहुल उर्फ राणा बाजीराव सोळुंके (२५, रा. घाटी, बेगमपुरा परिसर) हा पसार झाला. हितेंद्र वाघमारे आणि आकाश चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच नांदेड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय ढगे याच्यावर नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, तो फरार झाला होता. कुख्यात गुन्हेगार राहुल उर्फ राणा याच्याविरुध्द विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई रवि जाधव यांच्या तक्रारीवरुन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विकास खटके करत आहेत.

कोम्बिंग आॅपरेशनमध्ये दोघे अटकेत……

पुंडलिकनगर पोलिसांनी राबविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये जालन्यातील बीएसएनएल कार्यालयातील कर्मचारी सुजाता नरवडे यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पसार असलेल्या मनोज बळीराम जाधव (३०) याला सिडको, एन-३ भागातून अटक करण्यात आली. तर शटर फोडी प्रकरणातील शेख इरफान शेख लाल याचा साथीदार शेख बबलु याला पकडण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, विकास खटके, रावसाहेब मुळे, मीरा चव्हाण, जमादार रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, दीपक जाधव, रवी जाधव, राजेश यदमळ, प्रविण मुळे, जालिंदर मांटे आणि अजय कांबळे यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!