Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 33782 कोरोनामुक्त, 1871 रुग्णांवर उपचार सुरू , 113 नवे रुग्ण

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 188 जणांना (मनपा 129, ग्रामीण 59) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 33782 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36689 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1036 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1871 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 57 आणि ग्रामीण भागात 13 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा ( 39)

मुकुंदवाडी (1), खिंवसरा पार्क उल्कानगरी (1), लेबर कॉलनी (1),दर्जी बाजार छावणी (1), अजब नगर, श्रीराम अपार्टमेंट (1), हॉटेल गंगामाई (1), उदय कॉलनी (1), गजानन नगर (1), बीड बायपास (1), बजरंग कॉलनी (1),पिसादेवी रोड, परिसर(2), म्हसोबा नगर , हर्सूल (2), जाधवमंडी, बांबू मार्केट (3), राहत कॉलनी (1),एस बी कॉलनी (1),कांचनवाडी (1), नक्षत्रवाडी (1), कासलीवाल मार्वल (1), अहिल्याबाई होळकर चौक (1),एमआयटी सीसीसी (1), सातारा परिसर (1), समर्थ नगर (1),जटवाडा रोड परिसर (1), सुपारी हनुमान, गुलमंडी (1), उत्तरा नगर चिकलठाणा (1), जयभवानी नगर (1), विशाल नगर (1), जवाहर कॉलनी (1), श्रीनिकेतन कॉलनी (2), हरीराम नगर (1), शहानुर वाडी (1), उल्का नगरी , गारखेडा (1), एन नऊ, हडको (1) मिलिट्री हॉस्पिटल (1)

ग्रामीण ( 17)

बन्सीलाल नगर , वैजापूर (1), कल्याण नगर वैजापूर (1), वाकळा, वैजापूर (2),
औरंगाबाद (5), फुलंब्री (2), गंगापूर (2), सिल्लोड (4)

दोन कोरोनाबधितांचा मृत्यू

घाटीत कांचनवाडी, पैठण रोड येथील 75 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील 70 वर्षीय पुरुष कोरोनाबधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!