Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : दुनिया : चिंताजनक : उपासमार व कुपोषणाच्या जागतिक सूचित भारत गंभीर स्थानावर

Spread the love

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये १०७  देशांच्या भारत यावर्षी ९४ व्या क्रमांकासह गंभीर श्रेणीत आला आहे. जगभरात उपासमार व कुपोषणाच्या स्थितीवर नजर ठेवणारी ग्लोबल हंगर इंडेक्स वेबसाइटने शुक्रवारी हा अहवाल प्रसिद्ध केला, जो शनिवारी समोर आला. विशेष म्हणजे या इंडेक्समध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमार यांनाही गंभीर प्रकारात स्थान देण्यात आले आहे. मात्र तिघांची रँक भारतापेक्षाही वर आहे. बांगलादेश ७५ व्या, म्यानमार ७८ व्या आणि पाकिस्तान ८८ व्या स्थानावर आहे. नेपाळ ७३ व्या क्रमांकासह मॉडरेट हंगर कॅटेगरीत आहे. याच प्रकारात श्रीलंका ६४ क्रमांकावर आहे.

दरम्यान यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट केले की, “भारतातील गरीब भुकेले आहेत, कारण सरकार फक्त त्यांच्या काही खास मित्रांचे खिसे भरत आहे.”

या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या अहवालानुसार, भारतात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण३७.४ % तर खराब शारीरिक विकासाचे प्रमाण १७.३% आहे. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये मृत्यु दर ३.७ % आहे. देशातील१४% लोकांना पूर्ण पौष्टिक आहार मिळत नाही. गंभीर  प्रकारात जगातील ३१  देशांचा समावेश आहे. यांचा स्कोअर २० पेक्षा जास्त आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सने देशांमधील उपासमार आणि कुपोषणाच्या स्थितीवर आधारित स्कोअर देऊन त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानसह३१ देश गंभीर प्रकारात आहेत.

यामध्ये एस्वातिनी, बांगलादेश, कंबोडिया, ग्वाटेमाला, म्यानमार, बेनिन, बोस्तवाना, मालावी, माली, व्हेनेझुएला, केनिया, मॉरिशियाना, टोगो, कोटे डी आइवर, पाकिस्तान, टांझानिया, बुरकिना फासो, कॉन्गो , इथिओपिया, अंगोला, भारत, सुदान, कोरिया, रवांडा, नायजेरिया, अफगाणिस्तान, लेसोथो, सेरा लिओन, लायबेरिया, मोझाम्बिक, हैती या देशांचा समावेश आहे.

या अहवालात म्हटले की बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तानच्या १९९१ ते २०१४पर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की कुपोषणाचे शिकार मुख्यतः अशी मुले आहेत ज्यांची कुटुंबे कमकुवत आहार, आईची कमी साक्षरता आणि दारिद्र्य यांसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत. या वर्षांत भारतात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये ट्रॉमा, संसर्ग, न्यूमोनिया आणि डायरियामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट झाली आहे. मात्र प्री-मॅच्युरिटी आणि कमी वजनामुळे गरीब राज्यांमध्ये आणि ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!