Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यातील रुग्णांच्या उपचाराचा चढता आलेख , अॅक्टिव रुग्ण संख्या केवळ १ लाख ८२ हजार ९७३

Spread the love

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घाट होत असल्याचे दिलासादायक चित्र असून आज दिवसभरात ९ हजार ६० नवे रुग्ण आढळून आले तर  १५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर पोहचली आहे. यामध्ये १ लाख ८२ हजार ९७३ अॅक्टिव रुग्ण असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या  रुग्णांची संख्या १३ लाख ६९ हजार ८१० आहे तर कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजार ११५ इतकी आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. सद्यस्थितीस राज्यात २४ लाख १२ हजार ९२१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २३ हजार ३८४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.८६ टक्क्यांवर पोहचला आहे.

दरम्यान देशात सामूहिक संसर्ग झाला आहे पण तो काही राज्यांपर्यंतच मर्यादित असून अद्याप सर्वत्र पसरलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. ‘संडे संवाद’ या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात ते बोलत होते. सध्याच्या घडीला भारतात कोरोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता कोरोनाच्या साथीचा आलेख हळूहळू कमी होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. गेल्या काही महिन्यापासून राज्यात कोरोना रुग्णांचा चढता आलेख सध्या घसरणीला लागला आहे. सलग गेल्याकाही दिवसांपासून ही घसरण होत आहे. रविवारीही हीच घट दिसून आली. दिवसभरात नवे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्यातही घट झाल्याचं दिसून आलं आहे. रविवारी ११ हजार २०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

करोना संसर्गाच्या विळख्यात अडकलेल्या महाराष्ट्राला आता दिलासा मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे तसंच, मृत्यसंख्येतही घट होताना दिसत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या सात महिन्यांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती होती. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनानं कंबर कसली होती. प्रशासनाच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. राज्य करोनामुक्त होण्याच्या दिशेनं एक एक पाऊल पुढं टाकत आहे असेही टोपे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!