Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVaccineUpdate :  ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर भारतात येत आहेत आता सुरु होत आहेत ” या ” लसींच्या चाचण्या…

Spread the love

कोरोनाचा संसर्ग कायमचा रोखता यावा यासाठी जगभर लसींचा शोध लावण्यात येत असून या लसीच्या यशस्वीतेसाठी जगभरातील अनेक देशांमध्ये चाचण्या घेणे आणि  संशोधित लसीचे  परिणाम तपासणे अनिवार्य आहे . याच मालिकेत  ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर भारतात  आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या चाचण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हि परवानगी दिली असून  रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने स्पुटनिक व्ही  ही लस तयार केली आहे. रशियामध्ये सध्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातीलचाचण्या सुरू आहेत. भारतात या लशीच्या चाचण्या करण्यासाठी भारताच्या डॉ. रेड्डीज  कंपनीने रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी  करार केला आहे.

डॉ. रेड्डी लेबोरेटरीज आहेत भारतीय पार्टनर

दरम्यान त्यानुसार भारतात या लशीच्या चाचण्या करण्यासाठी डॉ. रेड्डीजने डीसीजीआयकडे अर्ज केला होता. डीसीजीआयने सुरुवातीला परवानगी दिली नाहीमात्र  त्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा अर्ज केला आणि आता या लशीच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे.  लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्याही  सुरू केल्या जाणार आहेत. याविषयी माहिती देताना डॉ. रेड्डी लेबोरेटरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि को-चेअरमन जीव्ही प्रसाद म्हणाले कि , “पूर्ण प्रक्रियेत डीसीजीआयच्या मार्गदर्शनांचा आम्ही स्वीकार करत आहोत. भारतात आम्हाला ट्रायल सुरू करायला परवानगी मिळाली ही खूप मोठी बाब आहे. महासाथीचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”

दुसऱ्या लशींचीही तयारी

रशियाने स्पुटनिक व्ही  लस लाँच करत आपण जगातील सर्वात पहिली लस तयार केल्याचा दावा केला. एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित असलेली ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली आहे. सध्या १३,००० लोकांना ही लस दिली जाते आहे. या लशीला ११ ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. मात्र तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच लशीला परवानगी दिल्याने या लशीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहेत. रशियाची दुसरी EpiVacCorona लस सिंथेटिक लस आहे. सायबेरियातील व्हेक्टर इन्स्टिट्युटने ही लस तयार केली आहे. ही लस Sputnik V पेक्षा सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. याचं ट्रायल 100 जणांवर करण्यात आलं आहे. रशियाचे उपराष्ट्राध्यक्ष तात्याना गोलिकोवा आणि चीफ सेनेटरी डॉक्टर अन्ना पोपोवा यांनी हे लस घेतली आहे, त्यांनी याच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिलेली नाही.  या लशीला १४ ऑक्टोबरला मंजुरी दिली आहे. लशीचे ६०,००० डोस लवकरच तयार केले जाणार असून  ४०,००० णांवर पोस्ट रजिस्ट्रेशन क्लिनिकल ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

आणि हि आहे तिसरी लस

या शिवाय रशियाची तिसरी कोरोना लस चुमाकोव्ह सेंटर ऑफ रशियन अॅकडमी ऑफ सायन्सेसने तयार करण्यात आली आहे. या लशीचं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पहिला टप्पा ६ ऑक्टोबरला सुरू झाला. त्यावेळी १५ जणांना ही लस देण्यात आली आहे. यापैकी कुणामध्येही लशीचा दुष्परिणाम दिसलेला नाही, असं सांगितलं जातं आहे. या लशीचं दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यावेळी २८५ जणांना लस दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. क्लिनिकल ट्रायल डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या लशीला डिसेंबर 2020  पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!