Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मोठी बातमी : पोलीस आयुक्तांची धडाकेबाज कारवाई , तीन वेळा कारवाई करूनही चालूच होता कुंटणखाना, दोन सराईत दलालांसह चौघांना अटक

Spread the love

औरंगाबाद – तीन वेळा कारवाई करूनही कुंटणखाना चालविण्याचे दु :साहस करणारा दलाल तुषार राजन राजपूत याच्यावर पुन्हा एकदा कारवाई करीत पोलिसांनी बीड बायपास, सातारा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीमधील कुंटणखान्यावर छापा मारुन,  पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेशातील एका वेश्यासह दलाल तुषार राजन राजपुत (३५, रा. लक्ष्मी कॉलनी, छावणी), प्रविण बालाजी कुरकुटे (३५, रा. आलोकनगर, बीड बायपास) तसेच दिनेश प्रकाश शेट्टी (रा. गुरु लॉन्सजवळ) आणि कैलास ब्रम्हदेव पासवान (रा. झारखंड) या चौघांना गजाआड केले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास कमलनयन बजाज रुग्णालयामागील वरद एव्हेन्यू अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये करण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वेळा कारवाई करूनही गेल्या अनेक वर्षांपासून तुषार राजपुत आणि प्रविण कुरकुटे यांचा हा कुंटणखाना सुरूच आहे. या दोघांचा कुंटणखाना पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या विशेष पथकाला शनिवारी मिळाली होती. त्यावरुन पथकासह दामिनी पथकाच्या वर्षाराणी आजले यांनी पंटरच्या मदतीने गट क्र. २२ मधील वरद एव्हेन्यू येथे छापा मारुन उत्तर प्रदेशातील एका तरुणीला ताब्यात घेतले. तसेच तुषार राजपुत, प्रविण कुरकुटे, दिनेश शेट्टी, कैलास पासवान यांचीही धरपकड केली. त्यांच्याकडून सात मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. राजपुत आणि कुरकुटेने काही दिवसांपुर्वी वनबीएचके फ्लॅट किरायाने घेतला होता. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रोडे , विनोद पवार , विजय निकम , इम्रान पठाण , रवी धानोरे , अनिल खरात , चरणसिंग जंजाळ , मनोज विखणकार , मनोज राठोड, विठ्ठल आडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली.
……..

यापुर्वी अडकला होता सापळ्यात…..

२०१४ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने पैठण रोडवरील एका बंगल्यात सुरू असलेल्या तुषार राजपुतच्या कुंटणखान्यावर विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी छापा मारला होता. तसेच याप्रकरणानंतर राजपुतने गारखेड्यातील सूतगिरणी चौकात असलेल्या एका हॉटेल मालकाला साथीदार विकास हुमणेच्या मदतीने लुटले होते. २०१७ साली राजपुतवर वाळुज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच काळात तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी राजपुतच्या वाढत्या कारवायांमुळे त्याच्यावर एक वर्ष स्थानबध्दतेची कारवाई सुध्दा केली होती. ४ जुलै रोजी पुंडलिकनगर पोलिसांनी छापा मारुन एमआयटी महाविद्यालयासमोरील व्दारकादास नगरात कारवाई करण्यात आली होती.
……..

विदेशी तरुणींचा समावेश…..

तुषार राजपुत हा अट्टल गुन्हेगार असून, गोवा, मुंबई, दिल्ली, कोलकाता याशिवाय अन्य मेट्रो सिटीसह विदेशातील तरुणींना वेश्या व्यवसायासाठी तो प्रवृत्त करत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. रशियन तरुणींचे फोटोग्राफ्स त्याच्या मोबाईलमध्ये आढळुन आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!