Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : ऐकावे ते नवलंच !! बॅंकखाते भाड्याने देण्याचा गुन्हा आला उघडकीस, एकास अटक

Spread the love

औरंगाबाद – बॅंकखाते भाड्याने देऊन पैसे  हडप करण्याचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी सायबर पोलिस ठाण्याला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी अटक केला आहे. तर पैसे  ट्रान्सफर करणारा ट्रेस केला आहे. एक वर्षापूर्वी सारंगसोसायटीतील रेणूका राजे (४२) या  पटियाला बॅंकेजवळील एस.बी.आय. बॅंकेच्या एटीएम मशीन मधे नवीन एटीएम कार्ड  जनरेट करंत  होत्या. त्यावेळी एका भामट्याने तुम्ही चुकीचा पीन जनरेट करंत आहात असे म्हणंत एटीएम कार्ड ची अदलाबदल करुन राजे यांचे ६० हजार रु. हडप केले होते.

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतांना राजे यांचे ६० हजार रु. एस.बी.आय. बॅकेच्या बनावट खात्यावर ट्रांन्सफर झाले व त्या बनावट खात्यातून ६० हजार रु. राजेश शिवप्रसाद यादव (४२) उत्तरप्रदेश हल्ली मु. घाटकोतर रोड कांदिवली वेस्ट  याच्या खात्यावर ट्रांसफर झाले होते. त्यामुळे राजेश यादवला पुंडलिकनगर पोलिसांनी मुंबईहून अटक करुन आणले. यादव हा कॅंटीन चालवतो. पैसे  ट्रान्सफर करणार्‍या भामट्याने १ लाखाला २० हजार. असा किराया ठरवल्याचे आरोपी यादव ने एपीआय घन्नशाम सोनवणेंना दिलेल्या जबाबात सांगितले की, आपण पैसे  ट्रान्सफर करणार्‍याला ओळखंत नाही. फक्त फोन वरुन संपर्क झाल्यामुळे माझे बॅंकेखाते त्याने भाड्याने मागितले व मी दिले. हा प्रकार पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या कानावर घातल्यावर त्यांनीही हा गुन्ह्याचा प्रकार आपण प्रथमच पाहात आहोत. या प्रकरणी सायबर पोलिसांना विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले असून शहरातील सर्व बॅंकांमधे असे प्रकार घडतात का ? हे तपासण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. पीएसआय प्रभाकर सोनवणे हे अधिक तपास करंत आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!