Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : सतत मास्क वापरणारांबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी केले हे आश्चर्यजनक वक्तव्य

Spread the love

जगभरात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या गाईड लाईन्स नुसार मास्क वापरणे बंधनकारक असले तरी त्याकडे  दुर्लक्ष करीत मास्क घालणारे लोक कायमच कोरोनाग्रस्त असतात असं वादग्रस्त वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे. खरंतर काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र यातून ते बाहेर आले. २६ सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. असं असूनही ट्रम्प यांनी आता मास्क घालणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दरम्यान दि. २६ सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या कार्यक्रमात आलेल्या अनेक पाहुण्यांनी मास्क घातले नव्हते. त्यांना याबाबत जेव्हा मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की सतत मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त होतात. ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्याला कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टि दिलेली नाही. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसून येतं आहे. कोरोनाबाबत त्यांनी याआधीही अनेक वक्तव्यं केली आहेत हा चायनीज व्हायरस आहे असंही वक्तव्य त्यांनी जानेवारी महिन्यात केलं होतं. आता सतत मास्क घालणारे लोक कोरोना संक्रमित असतात असं खळबळ उडवून देणारं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!