Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : WHO चे वराती मागून घोडे , आता म्हणताहेत ” रेमडेसिवीर” औषध कोरोनावर फारसे प्रभावी नाही

Spread the love

सर्वत्र  रेमडेसिवीर या औषधावर चर्चा होत असताना , त्याच्या तुटवड्याच्या , हे औषध चढ्या भावाने विक्री करण्यात येत असल्याच्या बातम्या येत असतानाच कोरोनाच्या उपचारावर हे औषध फारसं प्रभावी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये रेमडेसिवीर औषधाचा करोनाबाधितांवरील उपचारात फारच कमी प्रभाव दिसून आला. कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याच्या दिवसातही घट झाली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याशिवाय, गंभीर प्रकृती असलेल्या बाधितांचे प्राण वाचवण्यासाठीही हे औषध प्रभावी ठरले नसल्याचे आढळून आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

या वर्षी  मे महिन्यात कोविड-१९ बाधित रुग्णांवर रेमडिसिवीर हे औषध प्रभावी सिद्ध होत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर या औषधाच्या वापरामुळे करोनाबाधित लवकर बरे होत असल्याचा दावा करण्यात आला. आता, जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मोठ्या खुलाशानंतर रेमडेसिवीर औषधाने उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांना धक्का बसला आहे. आता मात्र जागतिक आरोग्य संघटनेचा हा निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे असे म्हटले तेर वावगे ठरू नये.

यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, सॉलिडॅरिटी चाचणीच्या दरम्यान चार औषधांची चाचणी करण्यात आली. हे चारही औषधे करोनाबाधितांच्या उपचारासाठी अनेक देशांमध्ये वापरण्यात येत आहेत. या चाचणीत रेमडेसिवीरशिवाय हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अॅण्टी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनावीर-रिटोनावीर आणि इंटरफेरॉन या औषधांची चाचणी करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने ३० देशांमधील ११ हजार २६६ वयस्कर रुग्णांवर या औषधांचा कसा परिणाम होतो, याची चाचणी केली. त्यामध्ये ही औषधे कोरोनाच्या संसर्गाला उपचारासाठी फारसे प्रभावी नाहीत. त्याशिवाय, या औषधांच्या वापरामुळे मृतांच्या संख्येतही घटही  झाली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की या चाचणी दरम्यान औषधांचा खास परिणाम होत असल्याचे दिसून आले नाही. यातील हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरास आधीच मनाई करण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेचे हे चाचणी संशोधन लवकरच एका वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे. त्यानंतर या संशोधनाला मान्यता मिळेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!