Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिवसभरात ११ हजार ४४७ नवीन रुग्णांचे निदान तर ३०६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू , उपचारचा दर ८५ टक्के

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात आज ३०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ११ हजार ४४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १३ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता १ लाख ९० हजारच्याही खाली आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट आधीच ८५ टक्क्यांच्यावर पोहचला असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. करोना मृत्यूदर कमी होत नसल्याने ती चिंता मात्र आजही कायम आहे.

दरम्यान राज्यात आज १३ हजार ८८५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असल्याने  आतापर्यंत एकूण १३ लाख ४४ हजार ३६८ रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८५.३ टक्के इतके झाले आहे. राज्यात आज ११ हजार ४४७ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ३०६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.६३ टक्के इतका आहे. राज्यात करोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या आता ८० लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आतापर्यंत एकूण ७९ लाख ८९ हजार ६९३ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १५ लाख ७६ हजार ०६२ (१९.७३ टक्के ) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३ लाख ३३ हजार ५२२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २३ हजार ४०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार  राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १ लाख ८९ हजार ७१५ इतकी आहे. हा आकडा वेगाने खाली येत आहे. पुणे जिल्ह्यात ४० हजार ४१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात ३० हजार २८० आणि मुंबई पालिका हद्दीत २२८८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.  राज्यात आज ३०६ मृत्यूंची नोंद झाली. त्यात मागील ४८ तासांत १११ रुग्णांचा मृत्यू झाला तर ७० मृत्यू मागील आठवड्यातील आणि उर्वरित १२५ मृत्यू एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपू्वीचे आहेत. आज सर्वाधिक ४४ मृत्यू पुणे महापालिका हद्दीत झाले तर मुंबईत ३७ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली ही. ही वाढ कायम असून आता कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 85 टक्क्यांच्या वर गेलं आहे. मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र घट होताना दिसत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!