Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : महिला पोलिसांना पाहून पळालेल्या चोरट्यांचे प्रकरण गंभीर : विनायक देशमुख

Spread the love

औरंगाबाद – काल औरंगाबादेत महिला पोलिस ला पाहून दोन चोरटे पळाले.घडलेला घटनाक्रम रेकाॅर्डवर घेतला गेला नाही. या प्रकरणात बदनापूर पोलिस किंवा वाळूज औद्योगिक पोलिस या पैकी कोणाचीही चूक असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण जालना पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी दिले.

काल बुधवारी दुपारी बदनापुर पोलिस निरीक्षक खेडकर यांच्या सांगण्यावरुन महिला पोलिस कर्मचारी खरात या जामिनावर सुटलेल्या मोटरसायकल चोरांची चौकशी करण्यासाठी वाळूज औद्योगिक पोलिसांकडे आल्या होत्या.त्यांना जामिनावर सुटलेले जगताप आणि कोरडे यांचा रितसर चौकशीसाठी ताबा हवा होता.पण तो नेमका कोणाच्या चुकीमुळे मिळाला नाही याचा तपास लागेलं या संदर्भात काल आपण औरंगाबादच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून खरा प्रकार जाणून घेतला आहे.पण यातही बदनापुर पोलिसांनी माध्यमांना वैगवेगळी माहिती दिली. वाळूज औद्योगिक पोलिस वेगळेच बोलतात.यामुळे घडलेल्या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. असेही शेवटी देशमुख म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!