Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CrimeNewsUpdate : प्रेमाला नकार दिला म्हणून “त्याने” “तिला” पेटवले , “तिने”ही “त्याला” मग घट्ट पकडले आणि दोघांचाही मृत्यू झाला….

Spread the love

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथे परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने जिवंत जाळल्याची ची खळबळजनक घटना घडली आहे. या महिलेने त्याचे एकतर्फी प्रेमसंबंध संपवण्याची सूचना केली. मात्र आपल्या प्रेमास  नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिला पेटवून दिले या आगीत होरपळून तिचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान आरोपी तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं तेव्हा या नर्स महिलेने त्यालाही  घट्ट पकडले त्यामुळे तोसुद्धा ८० टक्के भाजला. या तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला  आहे. या घटनेत ज्या परिचारिकेचा मृत्यू झाला ती विजयवाडा येथील कोविड सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होती.

या प्रकरणात विजयवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे  आणि तरुणीचे गेल्या चार वर्षांपासून संबंध होते. गेल्या काही महिन्यांपासून या नर्स युवतीने त्या तरुणाकडे सगळे प्रेमसंबंध संपवण्याची मागणी केली होती. तरीही हा तरुण तिचा पिच्छा पुरवत होता. या परिचारिकेवर तो तरुण लग्नासाठी दबाव आणत होता. दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी या तरुणीने विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ज्यानंतर पोलिसांनी या तरुणाला समजही दिली होती. त्याच्याकडून यापुढे या तरुणीला त्रास देणार नाही असं लेखीही घेतलं होतं. ज्यानंतर या तरुणीने तिची तक्रार मागे घेतली होती.

दरम्यान सोमवारी जेव्हा ही परिचारिका कामावरुन परतत होती तेव्हा हा तरुण तिच्या जवळ पोहचला आणि तिच्याशी वाद घालू लागला. तू माझ्याविरोधात पोलिसात तक्रार का दिली होतीस या विषयावरुनही दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर राग अनावर झालेल्या या तरुणाने त्याच्याकडे असलेलं पेट्रोल परिचारिकेच्या अंगावर ओतलं आणि तिला पेटवलं. आगीत होरपळणाऱ्या तरुणीने त्यालाही घट्ट धरुन ठेवलं, त्यामुळे तो पळून जाऊ शकला नाही. शेवटी  दोघंही आगीत होरपळू लागल्याने ओरडू लागले. ज्यानंतर स्थानिकांनी तिथे येऊन आग विझवली. या प्रकरणात अत्यंत गंभीर रित्या भाजलेल्या त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत तो तरुण ८० टक्के भाजला होता . त्याला गुंटूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!