Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पोलिस आयुक्तांनी मोटारसायकलवर फिरून घेतला वाहतूक पोलिसांचा आढावा , ऑन द स्पॉट रिवॉर्ड आणि शो कॉज !!

Spread the love

पोलिसांवर नेहमी सगळीकडूनच टीका होत असली तरी औरंगाबाद शहरात वाहतूक पोलिस उत्कृष्ट पध्दतीने काम करंत असल्याची खात्री स्वता: फिरुन केल्यानंतर वाहतूक शाखेतील २५‍ कर्मचार्यांना पोलिसआयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी प्रत्येकी शंभर रुपये रिवार्ड (गुड सर्विस टिकीट) घोषित केले आहे. यानिमित्ताने पोलिस आयुक्तांनी पोलीसांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आहे. तर ज्यांच्या  कामात हलगर्जीपणा दिसला अशा १५ पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी स्वतः मोटारसायकलवर बसून शहर वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.

पोलिस कर्मचारी जोगदंड(२४३),जी.आर. शेख (१५९०), गोरे(२६५२),केदारे (३८०),खडसे(३३७) , केंद्रे  (२०४६), थोटे(१७२७), शेख(१३१८),शेख(२३५७), चंदेल(१९७९), टेकाळे(९७८), पवार(३९७), शिंदे(१०८३), ब्रम्हणावत(३५१), पाटील(१३४), मोहिपते(५२४), वाघमारे(२४८८), चव्हाण५७५), सोनवणे(२९३७), पठाडे(१७८४), राठोड(५१९), शेलार, कुबेर(१९४३), राठोड(२४१६) अशी रिवार्ड मिळालेली कर्मचार्‍यांची नावे आहेत. गेल्या ८आॅक्टोबर ते ११आॅक्टोबर या काळात स्वता:पोलिसआयुक्त शहरात वाहतूक नियमनाचे निरीक्षण करंत होते.त्यानंतर त्यांनी वरील पध्दतीने वाहतूक कर्मचार्‍यांची प्रशंसा केली.या अचानक मिळालेल्या आश्र्चर्यकारक रिवाॅर्डमुळे वाहतूक पोलिसांमधे अनुशासनता असल्याचे मत पोलिसआयुक्तांनी व्यक्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!