Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MartahwadaNewsUpdate : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ परभणीत निदर्शने , खा. फौजिया खान यांचाही सहभाग

Spread the love

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी संविधान बचाव समतीच्या वतीने आज परभणीतील अपना चौकात इंसाफ दो अशा घोषणा देत प्रतिकात्मक स्वरुपात निषेध नोंदविण्यात आला. या प्रसंगी लोकनेते विजय वाकोडे, काॅ. राजन क्षीरसागर, मौलाना जहांगीर नदवी, डाॅ.धर्मराज चव्हाण, नितिन सावंत, डाॅ. सुनिल जाधव आदींच्या निवडक उपस्थितीत न्यायाची हाक देण्यात आली.

विशेष म्हणजे खासदार प्रा.डाॅ. फौज़िया खान यांनी यांनी स्वयंस्फूर्त आंदोलनस्थळाला भेट देऊन आंदोलकर्त्यांशी चर्चा केली. या संघर्षात आपण कायम सोबत असून आपला आवाज राज्यसभेत पोहचेल असा विश्वास दिला. एखाद्या खासदाराने हसरथ प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात स्वतःहून सहभाग नोंदविण्याची कदाचित महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, तपास सीबीआयकडून काढून घेऊन सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत करा ह्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. संविधानिक मूल्यांच्या रक्षणार्थ अपना काॅर्नरने आज पर्यंत अनेक सभा, आंदोलनं पाहिली आहेत. आज  हाथरस येथील पीडितेला न्याय मिळावा म्हणून परभणीत सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र परभणीकरांना दिसले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!