Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : फिल्मी दुनियेची बदनामी करणाऱ्या वृत्त वाहिन्यांच्या विरोधात, ३४ प्रॉडक्शन हाऊसेस दिल्ली उच्च न्यायालयात

Spread the love

फिल्मी दुनियेसंदर्भात बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे. गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचं काम या सगळ्यांनी केल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात या प्रॉडक्शन हाऊसेसनी बेजबाबदार बातमीदारीचा ठपका ठेवला आहे.

दरम्यान दिल्लीतील कोर्टात या चार जणांविरोधात आणि दोन चॅनल्स विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अजय देवगण, करण जोहर, अक्षय कुमार, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर, झोया अख्तर यांच्यासह महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसेसचा समावेश आहे. द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. बॉलिवूडमधल्या कलाकारांविरोधात डर्ट, फिल्थ, स्कम, ड्रगीज अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली. हे शब्द सिनेसृष्टीसाठी अपमानजनक आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे.

द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया , द सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन, इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिल, स्क्रीन रायरटर्स असोसिएशन, आमिर खान प्रॉडक्शन्स, अॅड लॅब फिल्म्स, अजय देवगण फिल्म्स, आंदोलन फिल्म्स, अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क,  अरबाझ खान प्रॉडक्शन्स, आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शन्स, बीएसके नेटवर्क अँड एन्टरन्टेमेंट, केप ऑफ गुड फिल्म्स, क्लिन स्लेट फिल्म्स, धर्मा प्रॉडक्शन्स, एमि एंटरटेन्मेंट अँड मोशन पिक्चर्स, एक्सएल एंटरटेन्मेंट, फिल्मक्राफ्ट एन्टरटेन्मेंट, कबीर खान फिल्म्स, होप प्रॉडक्शन, लव्ह फिल्म्स, नाडियादवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंट, वन इंडिया स्टोरीज , रमेश सिप्पी एन्टरटेन्मेंट, राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स, रेड चिलीज एन्टरटेन्मेंट, रिल लाइफ प्रॉडक्शन , रिलायन्स बिग एन्टरटेन्मेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स, रॉय कपूर फिल्म्स, सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स, टायगर बेबी डिजिटल, विशाल भारतद्वाज पिक्चर्स, यशराज फिल्म्स , या याचिकाकर्त्यांनी  मीडिया हाऊसेस विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!