Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशात अजूनही दलितांना दिली जातेय अस्पृश्यतेची वागणूक , पंचायतीच्या बैठकीत दलित महिलेला बसविले जमिनीवर !!

Spread the love

जे लोक कुठे राहिली आहे अस्पृश्यता असं प्रश्न उपस्थित करतात त्यांना याची प्रचिती देणारी लाजिरवाणी आणि संतापजनक घटना तामिळनाडूतल्या कुड्डलोर मध्ये उघडकीस आली आहे .  येथील  पंचायत अध्यक्षांच्या बैठकीत एका दलित महिलेला  खाली जमिनीवर बसवल्याचं उघड झालं आहे.  या बाबत हिंदू या दैनिकाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , कुड्डलोर इथल्या पंचायत ऑफिसमध्ये अध्यक्षांनी एका बैठकीचे  आयोजन केले  होते . त्या बैठकीत सगळ्यांना बसायला खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मात्र एका दलित महिलेला खाली जमिनीवर बसवलं गेलं. या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल  झाल्यानंतर त्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेत पंचायतीच्या अध्यक्षांविरुद्ध SC/ST कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे या बैठकीत अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या मात्र त्यावर त्या महिलेला जागा देण्यात आली नाही. भारतीय घटनेने समानतेची हमी दिली असली किंवा कायद्याने अस्पृश्यता समूळ नष्ट केलेली असली तरी अजुनही तथाकथित सवर्ण समाजाची मानसिकता बदललेली नाही हेच यातून दिसून येत आहे.  देशात अजुनही अस्पृश्यता पाळली जाते ही अतिशय लज्जास्पद आणि बुरसटलेल्या मानसिकतेचं प्रतिक आहे अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!